राजुरा (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील निसर्गरम्य पर्वतरांगामध्ये राज्यातील एक प्राचीन किल्ला चंद्रपूरच्या दक्षिणेस 27 किलोमीटरवर आहे. हा किल्ला इ.स. नवव्या शतकात वैरागडच्या नागवंशीय 'गहिलू' या माना राजाने बांधला. माना नागांची व बस्तरच्या नागाची कुलदेवता माणिक्यदेवी होती. राजाने या किल्ल्यास आपल्या कुलदेवतेचे नाव दिले. किल्ला म्हणजे 'गड' व माणिक्यदेवीच्या नावे म्हणून 'माणिकगढ' असे नाव प्रचलित झाले. निसर्गरम्य परिसरात वसलेला ऐतिहासिक प्राचीन किल्ला पर्यटनापासून वंचित आहे. अमलनाला व माणिकगड किल्ल्याच्या पर्यटनास चालना दिल्यास या भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.<br />(व्हिडिओ : सिद्धार्थ गोसावी, आनंद चलाख)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.